
बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून शुल्लक कारणावरून हाणामारी,अपहरन व खुनाच्या घटनेत वाढ होताना दिसत असल्याने बीड पोलिसांसमोर गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन झाले आहे. परळी तालुक्यात डांबी या गावात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
घरगुती वादातून महिलेची हत्या झाल्याची घटना डांबी (ता. परळी) येथे शुक्रवारी (दि.१२) रात्री घडली आहे. हत्या करुन आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शोभा तुकाराम मुंडे (वय ३५ वर्ष) रा. डांबी (ता. परळी) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेचे शुक्रवारी (दि.१२) रात्री घरगुती वाद सुरू होते. हा वाद रात्री टोकाला गेला आणि या महिलेची हत्या करण्यात आली. महिला मृत झाल्याचे लक्षात येताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. घटनेचे माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. तर फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.जोपर्यंत आरोपी तुकाराम मुंडेला अटक केली जात नाही,तोपर्यंत मृतदेह हलवू दिला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत पोलिसांना अडवले नातेवाईकांच्या या भूमिकेमुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला.
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने खूनाच्या घटना घडत आहेत. यामुळे जिल्ह्यात कायद्याची भीती कोणाला राहिली नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. तर लोकांचे रागावर नियंत्रण राहिले नसून चक्क माणूस समोरच्याच्या जीवावर उटत असल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या खूनाच्या घटना पाहता बीड जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.