पोलिसांकडून अविनाश सोनवणेला बेदम मारहाण.पँथर सोनवणे काय म्हणाले पहा.
त्या पोलिसावर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा.

बीड, दि. २१ सप्टेंबर २०२५ : आष्टी पोलीस चौकीत अविनाश सोनवणे (वय २८, रा. अंजनवती) यांना संशयित म्हणून पकडून अमानुष मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या अविनाशवर कोणताही गुन्हा नसताना, २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता रस्त्यावर उभा असताना पोलिसांनी त्यांना पकडले.त्याची मोटारसायकल (MH23AK5575) ताब्यात घेऊन चौकीत नेले, जिथे सिव्हिल ड्रेसमधील चार पोलिसांनी – नंदकिशोर सवाशे व इतर तिघांनी – त्यांना काळे-निळे होईपर्यंत मारहाण केली.विनाकारण पोलिस चौकीत बोलवून बेदम मारहाण केल्याने सोनवणे यांचे मानसिक खच्चीकरण झाले असून त्या पोलिसावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
अविनाश यांनी २० सप्टेंबरला बीड पोलिस अधीक्षकांना तक्रार देऊन दोषींना ७ दिवसांत निलंबित करण्याची मागणी केली आहे. “न्याय न मिळाल्यास एसपी कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करेन,” असा इशारा त्यांनी दिला. ही तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, दीपक केदार, मानवाधिकार आयोग आणि पोलिस आयुक्त यांना पाठवली आहे.
ऑल इंडिया पॅंथर सेनेचा इशारा : ऑल इंडिया पॅंथर सेनेचे प्रवक्ते नितीन सोनवणे यांनी तात्काळ चौकशीची मागणी करत, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
*पोलिसांची प्रतिक्रिया नाही* : बीड पोलिसांकडून अद्याप प्रतिक्रिया नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून, चौकशीकडे सर्वांचे लक्ष आहे.