ब्रेकिंग न्यूज

धांडे नगरच्या नागरिकांचे पाण्यात बसून आंदोलन.

न.प.CO फडसे आंदोलन स्थळी दाखल,नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

बीड : मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बीड शहरातील धांडे नगर परिसर अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बीड शहरातील सर्वात हाय प्रोफाईल व उच्च दराच्या प्लॉट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात राहणाऱ्या नागरिकांना मात्र पावसाळ्यात दरवर्षी त्रास सहन करावा लागतो.

बार्शी रोडवरील धांडे नगर कमान ते रेल्वे ब्रिज या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने संपूर्ण रस्ताच पाणथळीत बदलला आहे.पाण्यामुळे सतत होणाऱ्या त्रास आला कंटाळून आज धांडे नगर भागातील नागरिकांनी वाहत्या पाण्यात बसून आंदोलन केले.वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग नागरिक, विद्यार्थी,रुग्ण व वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

    स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून नाले बुजल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. परिणामी दरवेळी पावसात येथे पाणी साचून तलाव तयार होतो.

बीड नगरपालिकेने तातडीने अतिक्रमण हटवून नाले मोकळे करावेत, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. अन्यथा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत या भागात एकाही लोकप्रतिनिधींना फिरू देणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

नगर पालिका मुख्याधिकारी शैलस फडसे यांनी ठाणे नगर भागात भेट देऊन आंदोलन करणाऱ्या नागरिकांना शांत करत तात्काळ नाले सफाई सुरुवात करण्यात आली यावेळी नागरिकाच्या रोषाला फडसे यांना सामोरे जावे लागले. मुख्याधिकारी फडसे नागरिकांची भेट घेऊन जात असताना त्यांच्या समोर एक व्यक्ती पाण्यात पडला.

या आंदोलनात शैलेश जाधव ,दुर्गादास हुंबे ,गोरख हाडुळे ,परमेश्वर ढास,सुमित धांडे ,नितीन धांडे ,विठ्ठल शिंदे, उत्तरेश्वर सपटे ,सुंदर चोधरी ,अमित काळे,दाभाडे सर ,गंगावणेसर ,बापूसाहेब वाघमारे सह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

मनसे स्टाईल आंदोलन करणार : शैलेश जाधव

दोन दिवसात धांडे नगर मधील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर नगरपालिकेवर मनसे स्टाईल आंदोलन करणार असा इशारा शैलेश जाधव यांनी दिला. 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button