स्कार्पिओचा भीषण अपघात एकाच जागीच मृत्यू,एक गंभीर जखमी.
बीड/मांजूरसुंबा रस्त्यावरील दुर्दैवी घटना.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस होत असून यामुळे नागरिकाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मांजरसुंबा येथील शेख समीर पाशू हे सायंकाळी स्कॉर्पिओ मधून गावाकडे जात असताना पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनाचे टायर पाण्यात फिरले यामुळे गाडीवरील ताबा सुटून डिव्हायडरच्या पलीकडे विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवरा जाऊन धडकली.या अपघातात मांजरसुंबा येथील तिरंगा हॉटेलच्या मालकाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी सात वाजता घडली.
बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील तिरंगा हॉटेलच्या मालकाचा मुलगा शेख समीर पाशु व सोबत एक मित्र स्कार्पिओ मधून (क्रमांक एम.एच.२३ बी एच १०१०) बीडकडून मांजरसुंब्याकडे जात होता. मात्र स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर जाऊन स्कार्पिओ आदळली. या अपघातात शेख समीर याचा जागीच मृत्यू झाला आहे.तर एकाला गंभीर मार असल्याने बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हा अपघात डोंगरावरील पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने झाला अशी माहिती मिळाली असून अपघात झाल्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या,याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो.हा. मोराळे हे घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले व वाहतूक सुरळीत केली.
अपघाताची माहिती नातेवाईकांना मिळताच नातवाईकांनी बीड जिल्हा रुग्णालयात गर्दी केली.या अपघातामुळे कुटुंबावर व मांजरसुंबा दुःखाचा डोंगर कोसळला मित्रपरिवारानी हळहळ व्यक्त केली.