हरवलेले १६ मोबाईल पोलिसांनी शोधून तक्रारदारांना केले परत.
बीड ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी,तक्रारदार काय म्हणाले पहा.

बीड, दि. 30 सप्टेंबर :बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नागरिकांनी मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी नोंदवल्या होत्या. या हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथील पथकाने तब्बल 16 मोबाईल शोधून काढत संबंधित तक्रारदारांच्या हाती परत दिले आहेत.
पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बीड ग्रामीण यांचे देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये विविध मोबाईल कंपन्यांचे मिळून एकूण 16 मोबाईल परत मिळाले असून, त्यात नेलसिंग बडवणे, संभाजी पंडित, मोमिन शेख जावेद, रत्नाकर घुगे, शहा फैजुल्ला, आसाराम पोटेकर, निर्मळा बिळगिन, नामदेव काळे, गफार अब्दुलरहमान, शेख अन्वर, मच्छिंद्र आंबुले व इतर तक्रारदारांचा समावेश आहे.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलीस विभागाचे आभार मानले आहेत.
या कारवाईत पोलीस निरीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण हनपुडे,यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तसेच तांत्रिक सहाय्यक व कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग होता.
बीड ग्रामीण पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.