DPS इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल”अरोरा”यांनी राजीनामा दिल्याने विद्यार्थ्यांचे शाळेतच आंदोलन पहा !
प्रिन्सिपल अरोरा यांनी राजीनामा दिला की द्यायला लावला ? उलट सुलट चर्चा.

बीड शहरातील बार्शी रोडवरील असलेली श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल ही काही वर्षात नावारूपाला आली होती. परंतु मागील काही महिन्यात या शाळेतील संस्थापक पवार यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने याची चर्चा जिल्हाभर पसरली होती. हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल करण्यात आल्याची चर्चा होती.
शहरातील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये प्रिन्सिपल मॅडम अरोरा यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याच्या निषेधार्थ आज विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर बसून आंदोलन करत घोषणा दिल्याने शाळेत एकच गोंधळ उडाला.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी“we want principal” अशा घोषणा देत मॅडम अरोरा यांनी राजीनामा परत घेऊन शाळेत रुजू व्हावे, अशी मागणी केली. अचानक आंदोलन सुरू झाल्याने शाळेतील शिक्षकांची एकच धावपळ उडाली. विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालक काम सोडून शाळेकडे धावले, यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली.
प्रिन्सिपल मॅडम यांनी दबावाखाली की स्वखुशीने शाळा सोडली, याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. जवळपास तीन तास आंदोलन सुरू असतानाही शिक्षण विभाग वा पोलीस प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी आला नाही, ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. प्रिन्सिपल अरोरा मॅडम यांनी व्हिडिओ कॉल करून विद्यार्थी संवाद साधल्यानंतर विद्यार्थी शांत झाले होते.अरोरा यांनी राजीनामा का दिला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून, शाळेचे संस्थापक पवार बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.