पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत पत्नीला पतीने रंगेहात पकडल्याने राडा !
बीड बस स्थानकासमोर घडलेली घटना,तो पोलीस अधिकारी कोण ?

बीड बसस्थानकासमोर पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत महिला; पतीने रंगेहात पकडल्याने गोंधळ
बीड (दि. 3 ऑक्टोबर) : बीड बसस्थानकासमोर आज दुपारी मोठा गोंधळ उडाला. एका पोलिस अधिकाऱ्याच्या चारचाकी वाहनात एक महिला सापडल्याने तिच्या पतीने वाहन अडवून संताप व्यक्त केला.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला काही महिन्यांपासून त्या पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याची शंका पतीला होती. त्यामुळे तो पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. आज दुपारी पत्नी पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत बसताना दिसताच पतीने वाहन अडवले व बसस्थानकासमोर चांगलाच राडा घातला.चारचाकी वाहन क्रमांक MH23BC 3402 यामध्ये बसून पत्नी बीड सहारा बाहेर जात असल्याची माहिती मिळताच पतीने स्थानकासमोर चार चाकी अडवून ठेवत संताप व्यक्त केला. तो पोलीस अधिकारी गाडी अडवल्यानंतर जमावाचे अंगावर गाडी घालत असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे काही वेळ बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित पोलिस अधिकारी यापूर्वीही वादग्रस्त ठरला असून त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
बस स्थानकासमोर गोंधळ वाढू नये म्हणून पोलिसांनी तो अधिकारी व त्या महिलेला तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.