सोन्याची चैन चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात.
1 लाख 52 हजाराचा मुद्देमाल हस्तगत.स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई.

बीड : नेकनूर पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरी प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे. मांजरसुंबा येथे मागील महिन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत दीपक जोगदंड यांची सोन्याची चैन चोरीला गेल्या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अज्ञात चोरट्या विरोधात चोरट्या विरोधात गुन्हा क्रमांक 230/2025, कलम 303(2) भा.दं.सं. अन्वये दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपासी चक्रे फिरवून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला असता गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री झाल्यानंतरnकृष्णा वैजनाथ गुंजाळ (रा. माऊली नगर, बीड) यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एकूण 12 ग्रॅम सोन्याची चैन, किंमत अंदाजे ₹1,52,000/- रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार 1609 दुबाले, 402 मस्के, 1302 गायकवाड, 2029 सानप, पोलीस अंमलदार 2215 अश्फाक, 2210 परजणे आणि 2062 मांजरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
हस्तगत मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कार्यवाहीसाठी नेकनूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलीस पथकाचे अभिनंदन केले जात आहे.