अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला.
मृतदेहाची ओळख पटवण्याचे बीड ग्रामीण पोलिसांनी केले आवाहन.

बीड( प्रतिनिधी)बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत नगर रोडवर सैनिकी शाळेसमोर एक साधारण ६० वर्षे वयाचा अज्ञात इसम जखमी अवस्थेत आढळून आला होता. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ त्या इसमाला उपचारासाठी हलविले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
मयत इसमाने अंगावर मळकट पांढरा कुडता व पायजमा घातलेला असून दाढी वाढलेली आहे. प्राथमिक तपासात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदर इसमाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या इसमाची ओळख पटलेली नसल्याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर हा इसम कोणाच्या ओळखीचा असेल तर तात्काळ बीड ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक:
पोहवा सतिश – 98346 03191
पोहवा फिरोज – 84466 55991
पोनि मारूती – 98236 71679
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.