
अभय जोशी (अंबाजोगाई) केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील बजगुडे वस्तीत येथील घटना. दि ५ रविवारी शाळेला सुट्टी असल्याने आर्या अमोल बजगुडे वय ६ वर्ष पहिलीत शिकणारी हि चिमुकली खेळत असताना उकिरड्यासाठी केलेल्या खड्यात पडली. काही वेळाने तिची आई शोधत आली असता तिने तिला खड्यातून वर काढले . नाकातोंडात पाणी गेल्याचे लक्षात येताच तिला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.दरम्यान चिमुकली गतप्राण झाली. या घटनेमुळे सम्पूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.