गुटखा वाहतूक करणारी कार पकडली.
बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.अन्न व औषध प्रशासनाचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष.

बीड(प्रतिनिधी) राज्य सरकारने गुटखा व तंबाखू जन्य पदार्थावर बंदी घातली असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र खुलेआम गुटखा विक्री होत आहे. याकडे अन्नभेसळ अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
बीड पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गुत्ता विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कामगिरी बजावली आहे.
बीड स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एका गुत्ता वाहतूक करणाऱ्या कारवर छापा टाकला. ही कार मुंबईहून पान मसाला व गुत्ता विक्रीसाठी गुजरात राज्यात नेली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित वाहनाची तपासणी केली असता 5,73,280 किमतीचा गुटखा मिळून आला.
या कारवाईत आरोपी शेख मोहसिन शेख मलाउद्दीन (रा. मोमिनपुरा, बीड) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासोबत शेख बाबर, महंमदया कौलानी, शेख सोहेल शेख हसनबी या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडीची किंमत सुमारे 2 लाख बारा हजार 12 असून, एकूण मुद्देमालाची किंमत 7 लाखांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत आरोपी गुटखा विक्रीसाठी गुजरातकडे माल नेत असल्याचे समोर आले आहे. सदर आरोपीविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई नवनित काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, सचिन पांडकर,अपर पोलीस अधीक्षक बीड, शिवाजी बंटेवाड,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार आनंद मस्के, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, नितीन वडमारे, बाळु सानप पोलीस अंमलदार आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केलेली आहे.