
अभय जोशी :–
तांबव्यात सोयाबीनची गंज जाळली,शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
अंबाजोगाई/प्रतिनिधी :—-
केज तालुक्यातील तांबवा शिवारातील सर्व्हे नं.31 मधील महादेव उत्तम चाटे या शेतकऱ्याने शेतातील सोयाबीनचे पीक काढून त्याचा ढीग (गंजी) रचून ठेवला होता.त्याला खोडसाळपणे अज्ञात आरोपीने पेटवून जाळून टाकल्यामुळे आपली दिड लाख रुपयाची हानी झाल्याची फिर्याद महादेव उत्तम चाटे यांनी दिल्या वरून अज्ञात आरोपी विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
तांबवा शिवारातील सर्व्हे नं 31 मध्ये महादेव उत्तम चाटे यांची जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनी वरील सोयाबीनचे पीक काढून एका ठिकाणी ढीग (गंजी ) करून ठेवले होते. दरम्यान बुधवारी दि.15 ऑक्टोबर रोजी रात्री 7 ते गुरुवारी दि.16 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने खोडसाळ हेतूने व नुकसान करण्याच्या हेतूने सोयाबीन पिकाच्याकाढून ठेवलेल्या ढिगाला गंजीला आग लावून पेटवून दिल्यामुळे दिड लाखाची हानी झाल्याची फिर्याद महादेव उत्तम चाटे या तांबवा येथील शेतकऱ्याने दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आसून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली जमादार बाबासाहेब सानप हे पुढील तपास करीत आहेत.