वादळी वाऱ्यासह पावसाने पेट्रोल पंपाची छत कोसळले,रस्त्यावरील झाडे पडली.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केली पेट्रोल पंपाची पाहणी.

बीड शहरात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जवळपस एक तासाच्या पावसाने शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले तर जालना रोडवरील नाल्यांमधील पाणी रस्त्यावर वाहू लागले.
गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील वातावरणात बदल झाल्याने वादळ वाऱ्यासह रिमझिम पावसाची सुरुवात झाली होती. परंतु आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक आकाशात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसात सुरुवात झाली. या पावसाने नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपवरील छत कोसळले. पावसाचा आसरा घेण्यासाठी पेट्रोल पंप खाली अनेक नागरिक थांबले असताना वादळ वाऱ्यामुळे अचानक छत कोसळल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले. त्यामुळे पेट्रोल पंपाचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तात्काळ पोलीस पेट्रोल पंपास भेट दिली.
वादळी वाऱ्याने बीड शहरातील नगर रोडवरील अनेक वर्षाची असलेली झाड कोसळले त्यामुळे वाहतुक संथ गतीने सुरू होती.तसेच धानोरा रोडवरीलही झाडे आडवी झाल्याचे दिसत आहे.
वादळ वाऱ्यासह एक तास पाऊस झाल्याने तीन वाजल्यापासून शहरातील अनेक भागातील बत्ती गुल झाली.महावितरण कडून मान्सूनपूर्वक कामे करण्यात फेल झाले असल्याचे दिसत आहे. एक तासाच्या पावसाने शहरातील नागरिकांना उकड्यापासून मात्र सुटका मिळाली आहे.
बीड जिल्ह्यातील अचानक झालेल्या वादळी पावसाने एखाद्या ठिकाणचे झाडे पडली असेल,नाल्यातील पाणी रस्त्यावर आले असेल किंवा रस्त्यावर पाण्याचा तलाव साचला असेल तर याचा फोटो व्हिडिओ 8623880100 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.