वादळी पावसाने केला कहर,पुन्हा बीड शहराचा विकास पडला उघडा.
रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप,गटाराचे पाणी रस्त्यावर.

बीड जिल्ह्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते,गतवर्षीपेक्षा यावर्षी तापमानाचा पारा वाढल्याचे दिसत होते.पहिल्याच पावसाने जोरदार एन्ट्री केली. दुपारी अचानक वादळ वारा विजेच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.शहरातील जालना रोडवरील तसेच काझी नगर मधील नाली, गटारांचे पाणी रस्त्यावर वाहू लागले.त्यामुळे नगरपालिकेचा विकास उघडा पडल्याचे बोलले जात आहे.
तसेच बार्शी रोडवरील धांडे नगर कमानी मध्ये पाणी साचले होते.त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत होता.दुचाकी,चारचाकी पाण्यातून जात होत्या परंतु पायी चालण्यासाठी मात्र मार्ग सापडत नव्हता.अशीच परिस्थिती बार्शी रोडवर देखील पहावयास मिळाली या रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाल्या नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साचले होते.त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती तसेच रस्त्यावरच पाणी साचल्याने अपघाताच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर पाणी च पाणी झाल्याने सोमेश्वर मंदिर ते मुक्ता लॉन्स,जगताप कॉम्प्लेक्स मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाल्या.जालना रोड लगत नाल्या ओसंडून वाहत असल्याने नाल्याची घाण दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर आले होते, जालना रोडवरील महावितरण कार्यालयाच्या बाजूला गॅरेज मध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी या पाण्यात अडकून पडल्या होत्या. एक तासाच्या पावसाने शहराची दयनीय अवस्था पहावयास मिळाली. मोठा गाजा वाजा करत नगरपालिकेने बीड शहर स्वच्छ शहर असा दाखवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मान्सून पूर्व पहिल्याच पावसात बीडचा विकास उघडा पडल्याचे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने मान्सून पूर्व कामे न केल्याने शहराची ही अवस्था झाली असून आता तरी नगरपालिका मुख्याधिकारी, प्रशासक यांना जाग येईल का? असा प्रश्न बीड शहरवासी यांना पडला आहे.बार्शी रोडवर रस्त्याच्या दोन्हीं बाजूस नाला करून द्यावी अशी मागणी होत आहे.