ब्रेकिंग न्यूज

त्या लॉज,बियरबारचा परवाना रद्द करावा.

जिल्हाधिकारी व बीड पोलीस अधीक्षकांना नागरिकांनी केली निवेदनातून मागणी.

 सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग बीड तालुक्यातील चौसाळा येथील राजरोस, दिवसाढवळ्या वेश्या व्यवसाय चालत असल्याने चौसाळा येथील जानकी लॉज, बीअरबारचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून केली आहे.

सोलापुर-धुळे  राष्ट्रीय महामार्ग क्र.52 (जुना क्र.211) वर चौसाळा ता. बीड हद्दीत (पो.स्टे. नेकनुर ता. बीड) दशरथ तानाजी थोरात रा.चौसाळा ता.बीड यांचे मालकीचे जानकी लॉज,बिअरबार रेस्टॉरंट चौसाळा यामध्ये गेल्या राजरोस पणे वेश्या व्यवसाय चालु आहे. ही बाब पोलीस स्टेशन नेकनुर येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांना माहीत असून देखील कारवाई केली जात नाही विशेष म्हणजे चौसाळा पोलीस चौकी या हॉटेल पासुन फक्त 200 मिटर अंतरावर आहे.

1} सदर जानकी बिअरबार रेस्टॉरंट अॅड लॉजिंग, चौसाळा ता. बीड येथे वेश्या व्यवसाय चालु असल्याने मा.श्री. पंकज कुमावत साहेब (IPS) यांनी धाड धाकुन तेथील पिडीत महिलांची सुटका केली व जानकी बिअरबार रेस्टॉरंट अॅड लॉजिंग, चौसाळा चे मालक व चालक श्री. दशरथ तानाजी थोरात रा.चौसाळा यांचे विरुद्ध पो.स्टे. नेकनुर येथे गु.र.न.0214/2023 दि.29/07/2023 अन्वये स्त्रीया व मुली अनैतीक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम-1956 (सिट अधिनियम पुननिर्मीत) चे कलम 3, 4, 5 व 7 नुसार गुन्हा नोंद होवुन त्यांना अटक झालेली असुन तो सध्या जामीनावर सुटलेला आहे. तसेच मा. 5 वे न्याय दंडाधिकारी बीड यांचे न्यायालयात रेग्यलर क्रमीनल केस क्र. 760/2023 ने प्रकरण चालु आहे.

2} तसेच सदर जानकी बिअरबार रेस्टॉरंट अॅड लॉजिंग, चौसाळा वर नुकतीच मा. श्रीमती वर्षा व्हगाडे पोलिस निरीक्षक अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलिस अधिक्षक कार्यालय बीड यांनी पुन्हा धाड टाकुन परराज्यातील पिडीत महिलांची सुटका केली आहे. तसेच मालक श्री. दशरथ तानाजी थोरात रा. चौसाळा याचे विरुद्ध गु.र.न.0102/2025 दि.06/05/2025 अन्वये स्त्रीया व मुली अनैतीक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम-1956 (सिट अधिनियम पुननिर्मीत) चे कलम 3, 4, 5 व 7 तसेच भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) 2023 चे कलम 143(2), 143(3) नुसार गुन्हा नोंद असुन बार मालक फरार आहे.

3} जानकी बिअरबार रेस्टॉरंट अॅड लॉजिंग, चौसाळा चे मालक श्री. दशरथ तानाजी थोरात -रा.चौसाळा यांचे विरुद्ध पो.स्टे. नेकनूर येथे गु.र.न. 146/2019 नुसार भा.द.वि.353 नुसार गुन्हा नोंद असुन हायपर प्रकरण 3 रे अतिरीक्त न्यायधिश बीड यांचे समोर सेशन केस क्र.257/2019 नुसार चालु आहे.

थोरात कुटुंब हे गुंड प्रवृत्तीचे कुटुंब असुन त्यांचे दारु चे व इतर तत्सम दोन नंबरचे धंदे आहेत. दशरथ तानाजी थोरात याचे विरुद्ध जानकी बिअरबार रेस्टॉरंट अॅड लॉजिंग, चौसाळा येथे राजरोस पणे वेश्या व्यवसाय चालवत असल्याने विविध गुन्हे नोंद आहेत..

जानकी लॉज व बियरबार मध्ये राजरोस पणे दिवसा रात्री वेश्या व्यवसाय चालु असुन तेथे राज्यातील तसेच परराज्यातील महिला मुली आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय केला जातो. या लॉच्या काही अंतरावर एक महाविद्यालय असून विद्यार्थी व विद्यार्थिनीवर याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे चौसाळा परिसराची नाहक बदनामी होत आहे.या करीता जानकी बिअरबार रेस्टॉरंट अॅड लॉजिंग चा परवाना कायमस्वरुपी रद्द करुन सदर इमारत सिल करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी निवेदनातून बीड पोलीस अधीक्षक यांना दिली आहे.बीड शहर व परिसरात देखील अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय तसेच अल्पवयीन जोडताना रूम दिल्या जात आहेत त्या लॉजवर पोलीस अधीक्षकांनी कारवाई करून कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात यावा करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button