ब्रेकिंग न्यूज

बार्शी नाका चौकात बसची काच फोडली.

महिलेला छेडछाड केल्याने बस समोर मोठ्या प्रमाणात जमाव.

बीड शहरातील बार्शी नाका चौकामध्ये दुपारी चार वजनाच्या सुमारास सोलापूर बीड कडे येत असलेली बस बार्शी नाका चौकात आली असता काही लोकांनी बसला आडवे येत बसचि समोरील काच फोडली.

बस क्रमांक MH 09FL 0968 सोलापूर बीड कडे बार्शी नाका चौकात आले असते बस मध्ये एका महिलेस छेडल्याच्या कारणावरून महिलेने आपल्या नातेवाईकाला बार्शी नाका चौकात बुडवून घेत, त्या इसमला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव पाहून सदर बसचा दरवाजा ड्रायव्हर वर कंडक्टरने बंद केल्याने काहींनी बसच्या समोरील काचावर दगड मारला. यावेळी बार्शी नाका चौकात बस समोर मोठी गर्दी झाली असून घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून जमाव पांगवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी बार्शी नाकात चौकात वाहतूक कोंडी झाली होती.सविस्तर वृत्त काही वेळातच देण्यात येईल.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button