ब्रेकिंग न्यूज

मारहाणीचे व्हिडिओ काढून व्हायरल करण्याबाबद काय म्हणाले SP नवनीत कॉवत पहा.

व्हिडिओ काढून व्हायरल करणाऱ्यावर होणार कारवाई.

बीड (प्रतिनिधी) मागील काही महिन्यापासून मारहाणीचे व्हिडिओ शूट करून ते प्रसार माध्यमावर व्हायरल करून दहशत पसरविली जात होती.मात्र आता मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल करणारावर कठोर कारवाई होणार आहे. जो व्यक्ती आता हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करेल त्याला देखील आरोपी करणार असल्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काही भागांमध्ये हाणामारीचे व्हिडिओ शूट करून समाज माध्यमावर व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. या व्हिडिओमधून समाजात दहशतीचं वातावरण पसरत होते.

मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. जो व्यक्ती हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून वायरल करेल त्याला देखील आरोपी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे. काही व्यक्ती हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून वायरल करेल त्याला देखील आरोपी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे.. पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हाणामारीच्या घटना आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला रोख बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, हाणामारी घडवणं, त्यात सहभागी असणं याबरोबरच आता या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.  अशा व्यक्तींना गुन्ह्याच्या मुख्य आरोपींसोबतच आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात काही समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे व्हिडिओ वारंवार दिसू लागले होते. काहीजण मुद्दामून अशा हाणामाऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करत आणि ते सोशल मीडियावर टाकून त्यातून प्रसिद्धी किंवा दहशत मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी आता याला पूर्णविराम देण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे अशा घटनांमध्ये घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून हिंसाचाराचा प्रचार करणे, अशांतता पसरवणे किंवा समाजात भीती निर्माण करणे, हे गुन्हेगारी कृत्य असल्याचं पोलीस प्रशासन वारंवार सांगत असताना देखील असे व्हिडिओ व्हायरल केले जातात त्यामुळे आता अशा व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल होणार असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button