ब्रेकिंग न्यूज

सरपंच लाच घेताना रंगेहात पकडला.

विहिरीसाठी दहा हजाराची मागणी.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील विविध कार्यालयामध्ये लाच दिल्याशिवाय कामच होत नसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. बऱ्याच शासकीय कार्यालमध्ये कर्मचारी अधिकारी खाजगी इसमा द्वारे लाजेची मागणी करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.मागील काही महिन्यात लाचखोरांवर कारवाईत वाढ झाली असली तरी लाचखोरीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.

माजलगाव येथील तक्रारदार यांचे आईचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तीक लाभजलसिंचन विहिर योजनेसाठी ग्रामपंचायत किट्टी आडगांव ने तयार केलेल्या यादीत नांव आल्याने ते नांव लाभार्थीच्या अंतिम यादीत येणेकरीता,विहीरीचा परिपुर्ण प्रस्ताव अर्ज तयार करून देवुन मदत करण्याकरिता तसेच पंचायत समिती माजलगांव येथे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर ओळखीने प्रस्ताव मंजुर करण्यासाठी २०,००० रुपये लाचेची मागणी केली यातील दहा हजार लाच स्विकारताना किट्टी आडगावचे सरपंच रूक्मानंद खेत्रे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

या घटने बाबत अधिक माहिती अशी की दि.२० जुन रोजी तकारदार यांचे आईचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तीक लाभ जलसिंचन विहिर योजनेसाठी ग्रामपंचायत किट्टी आडगांव ने तयार केलेल्या यादीत नांव आल्याने ते नांव लाभार्थीच्या अंतिम यादीत येणेकरीता,विहीरीचा लाभ घेण्यासाठी इंजिनीयरसाठी दहा हजार पहिला हप्ता देण्याची मागणी केली असता तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने बीड लाचलोच प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क करून लाजेची मागणी करणाऱ्याचे नावे तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून माजलगाव पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात दहा हजाराची लाच स्वीकारताना पंचासमक्ष सरपंचाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

सदरची कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, मुकुंद अधाव,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, सोपान विटटमपल्ले, पोलीस उप-अधीक्षक, बीड, ला.प्र.वि. बीड यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि राहुलकुमार भोळ, समाधान कवडे यांनी व सहायक पोलीस उप-निरीक्षक सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश गवळी,अमोल खरसाडे, संतोष राठोड, प्रदीप सुरवसे, चालक अंबादास पुरी सर्व ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button