
बीड – शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल येथील खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उघड झालेल्या या प्रकाराने शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे.
बीड शहरातील मध्यवस्तीत असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुल येथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस चालतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
उमाकिरण शैक्षणिक संकुलात मोठ्या प्रमाणात क्लासेस चालतात. हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. अशात ही घटना उघड झाल्याने खळबळ माजली आहे.
विजय पवार व प्रशांत खटावकर या दोन्ही शिक्षकांवर अल्पवयीन मुलीवर जून 2024 ते मे 2025 पर्यंत विनयभंग,अत्याचार केल्याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राध्यापक विजय पवार हा फक्त उमाकिरण ओम कोचिंग क्लासेस येथे शिकवत नसून तो राजकीय क्षेत्रात सुद्धा अग्रेसर होता.तसेच श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल या शाळेचा संस्था चालक देखील आहे. असल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.