ब्रेकिंग न्यूज

पाच वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनच्या पथकाची कामगिरी.

पोलीस ठाणे बीड शहर यांचेमार्फत प्राप्त माहितीनुसार, फरार आरोपी विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील खुनातील फरार आरोपी सोनू काळवणे याच्यावर पो.ठा. बीड शहर गु.र.नं. 165/2014 भा.दं.वि. कलम 302, 307, 504, 34, 201 अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल असून, त्यास जन्मठेप व 10,000/- रूपये दंडाची शिक्षा मा. न्यायालयाने सुनावलेली आहे. सदरील प्रकरणांमध्ये स्वतःच्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला 2014 मध्ये यातील आरोपीने ठेचून ठार मारले होते. ऑनर किलिंगचा हा प्रकार होता. परंतु खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला हा आरोपी गेल्या पाच वर्षापासून फरार झालेला होता. 

      पोलिसांचा ताबा चुकऊन तो फरार झाल्याने याबाबत पो.ठा. शिवाजीनगर, बीड येथे गु.र.नं. 781/2018 भा.दं.वि. कलम 224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात मा. न्यायालय, बीड येथे CRPC कलम 299 नुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती. तसेच जिल्हा शोधपत्र (C-11040) देखील तयार करण्यात आले होते.

    परंतु पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबत जे गंभीर गुन्ह्यात फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्याची मोहीम काढलेली आहे. या मोहिमे अंतर्गत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17/07/2025 रोजी पोलीस ठाणे बीड शहरचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश जाधव, पो.ह. गहिनीनाथ बावनकर, पो.अ. राम पवार या तपास पथकाने सतर्कपणे काम करत सदर फरारी आरोपी विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे यास शोधून ताब्यात घेतले आहे.

सदर आरोपीस अटक करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button