वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड गोट्या गीतेचे अघोरी कृत्य पाहा !
"राम नाम सत्य है"म्हणत घराबाहेर ठेवायचा नैवेद्य.गोट्या गीतेचा तपास पोलिसांना लागत नाही की लावायचा नाही?

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडची टोळी पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आता वाल्मिक कराडचा चेला,राईट हॅन्ड गोट्या गित्ते याचे नवनवीन कारनामे समोर येऊ लागले आहेत.गोट्या गित्ते हा परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असून अघोरी कृत्य करताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रामनाम सत्य हे म्हणत रात्री दाराबाहेर नैवेद्य ठेवत असल्याचं समोर येत आहे. इतकच नाही तर गोट्या गित्तेचे हातात बंदूक घेतलेले व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. कुठे गीतेवर महाराष्ट्रात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसल्यावर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर चिन्ह निर्माण होत आहे.
वाल्मीक कराड आणि बबन गित्ते याचे शत्रुत्व अवघ्या बीड जिल्ह्याला माहीत आहे. बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी असलेला बबन गित्ते याच्या घराबाहेरील हा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. इतकच नाही तर गोट्या गित्तेचे हातात बंदूक घेतलेले व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.आता यावर पोलिस प्रशासन काय कारवाई करते का? याकडे लक्ष लागलेले आहे.फरार गोट्या गीतेला पोलिस कधी अटक करतात याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महादेव मुंडेंच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख सुत्रधार वाल्मिक कराडच्या रक्ताच्या व्यक्तींसह काही जणांनी महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा आरोप वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय बाळा बांगरने केला होता. या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.श्री व सुशील कराड असे दोन वाल्मीक कराडचे मुलं आहेत. त्याचबरोबर गोट्या गित्ते यांच्यासह आणखी काही जणांनी महादेव मुंडेंना वाईट पद्धतीने मारलं. त्यावेळी गळ्याजवळचा तुकडा काढण्यात आला हे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील समोर आलं आहे. कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर आता या प्रकरणाबाबत माहिती समोर आणत आहेत. त्यांनी हा तुकडा कराडच्या समोर ठेवण्यात आल्याचे सांगितलं, ही सर्व बाब मला आज मुंडे कुटुंबाकडून सांगण्यात आली असेही बाळा बांगर यांनी सांगितलं होतं.
कोण आहे गोट्या गित्ते ? महाराष्ट्रात त्याच्यावर गंभीर गुन्हे असताना देखील बिनधास्त मोकाट कसा.?
ज्ञानोबा मारुती गीते असं गोट्या गीतेचं खरं नाव आहे. वाल्मिक कराडचा तो राईट हँड असल्याचं सांगितलं जातं. परळीतील नंदागौळ या गावचा तो रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे. गेल्या १५ वर्षांपासून त्याच्यावर परळीसह परभणी, लातूर, बीड, पिंपरी-चिंचवड इथं अनेक गुन्हे दाखल आहेत. तो आख्या महाराष्ट्राला बंदुका पुरवत असल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये अनेकांच्या कमरेला दिसणारी पिस्तुलं या गोट्या गीतेनंच पुरवल्याचंही सांगितलं जातं.
“‘राम नाम सत्य है ” असे म्हणत घराबाहेर नैवेद्य !
बीड जिल्ह्यात गुन्हेगारी विश्वात चर्चेत असलेला ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते याचे अघोरी प्रताप समोर आले आहेत. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या गोट्या गित्तेचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा अत्यंत जवळचा सहकारी होता, वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच गोट्या गीते याने अनेक गुन्हे खून केल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.सध्या सोशल मीडियावर गोट्या गित्तेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो रात्रीच्या अंधारात घरासमोर ‘राम नाम सत्य है’ असं म्हणत नैवेद्य ठेवताना दिसतो. हा प्रकार तो अशा व्यक्तींच्या घरासमोर करत असल्याचं सांगितलं जातं, ज्यांच्या विरोधात गोट्या गीते धरून असे. त्यामुळे ही कृती अघोरी असून मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. गंभीर गुन्हे असताना देखील गोट्या गीते फरार कसा? त्याला कोणाचा वरदहस्त होता असा प्रश्न बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नागरिकांना पडला आहे.