बीड राष्ट्रवादितील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर !
काही बॅनरवरून आ.धनंजय मुंडे तर काही बॅनरवर डॉ.योगेश क्षीरसागरांचे फोटो गायब.

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील गटबाजी पुन्हा एकदा बॅनरच्या माध्यमातून समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर असून बीड शहरात लावलेल्या या बॅनरवारची चर्चाना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते यामुळे काही दिवसांपासून माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे वेगवेगळ्या कारणांमुळे चचत आहेत.
बॅनरवर नेमके काय आहे ?
आता बँनरवार ने बीडचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. बीड शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर धनंजय मुंडे त्यांचाच फोटो गायब असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर अजित पवारासह मंत्रिमंडळाचे इतर नेत्याचे फोटो आहेत. त्यामुळेच इथे वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले असून राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
युवा नेते,नगरसेवक अमर नाना नाईकवाडे, माजी सभापती विनोद मुळूक यांनी लावलेल्या बॅनरवर डॉ. योगेश क्षीरसागर यचा फोटो गायब आहे.यामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून अमर नाईकवाडे सह विनोद मुळूक हे योगेश क्षीरसागर याचे खंदे समर्थक होते, डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नेतृत्व मान्य नसल्याने हे काही दिवसापासून डॉक्टर योगेश शिरसागर यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
राजाभाऊ मुंडे,बाबरी मुंडे यांच आज प्रवेश सोहळा.
भाजपाचे राजाभाऊ मुंडे आणि बावरी मुंडे यांचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असून बॅनर लावण्यात आलेल्या फोटो मध्ये धनंजय यांचा फोटो नसल्याने प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेना खुलेआम विरोध केल्याचे बोलले जात आहे.शहरभर लावत आलेल्या बॅनरमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली असून राज्याची उपमुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी मधील गटबाजी संपवण्याचे एक आवाहन आहे.