ब्रेकिंग न्यूज

रेणुका कलाकेंद्रावर छापा.दोन पिडीत महिलांची सुटका.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची(AHTU) कारवाई.

एक गुजरातची तर दुसरी बाहेर जिल्ह्यातून आणून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोन पुरुष व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   बीड(प्रतिनिधी)केजमधील सारुळ गाव, केज कडे जाणाऱ्या रोडवर रेणुका कलाकेंद्रा मधे चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर छापेमारी करण्यात आली आहे.यावेळी दोन पीडीत महिलांची सुटका करुन वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तिघांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 काल दिनांक 05/08/2025 रोजी अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , पोलीस ठाणे केज हद्दीत सारुळ गाव येथे रेणुका कलाकेंद्रा मधे दोन महीला बाहेरून आणून वेश्या व्यवसाय करीत आहेत. ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावरून वरिष्ठांनी नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक देवीदास भागवत गात यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यावरून PI गात व अ. मा. वा. प्र. कक्षाच्या प्रमुख PSI पल्लवी जाधव व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी डमी ग्राहक व पंचासह सदर ठिकाणी सापळा रचून , डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या महिला एजंटने वेश्या गमनासाठी होकार देवून त्यासाठी ७५०० रुपयांची मागणी केली. डमी ग्राहकाने ठरल्या प्रमाणे रक्कम देवून पोलीस पथकास इशारा केला असता, पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. पैसे स्वीकारलेल्या महिलेला तिचे नाव गाव विचारले असता, तिने तिचे नाव मीना संतोष खराडे (वय ४० वर्षे रा.जुना धानोरा रोड , जीजाऊ नगर , संत कबीर गल्ली बीड) असे सांगितले. सदर महिलेची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या ५०० रू. दराच्या १५ नोटा मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त केल्या. सदर ठिकाणी दोन पीडित महिला मिळून आल्या. पीडीत महिलांना विश्वासात घेवून चौकशी केली असता , त्यांनी सांगितले की, मीना संतोष खराडे आणि तिचा सहकारी शेख शफीक शेख हमीद (वय ३१ वर्ष रा. कुर्बाण अलिशा नगर , दर्गा रोड परभणी), जागामालक रामनाथ ढाकने (फरार, वय ५९ रा. सारूळ )यांनी एका पीडीत महिलेस गुजरात वरून तर दुसरीस बाहेर जिल्ह्यातून आणून , स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेवून, पीडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले. आरोपी मीना संतोष खराडे हिची दोन पंचा समक्ष झडती घेतली असता, तिच्याकडे डमी ग्राहकाने दिलेल्या १५ नोटा व इतर साहित्य मिळून आले आहे. तिन्ही नमुद आरोपींवर पीडीत महिलांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना आणून स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करुन त्याच कमाईवर उदरनिर्वाह करुन वेश्याव्यवसाय करण्यास लावले व सदर महिलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावले म्हणून त्यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३,४,५,६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास गात नियंत्रण कक्ष , पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव , सहायक पोलीस उप निरीक्षक मीरा रेडेकर , महीला पोलीस हवालदार उषा चौरे, शोभा जाधव, पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोलीस शिपाई प्रदीप वीर, योगेश निर्धार सर्व नेमणूक अ. मा. वा. प्र. कक्ष यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button