
बीड(प्रतिनिधी)बीड शहरात दिनांक 01.08.2025 रोजी रामकृष्ण लॉन्स बीड येथे परळी येथील महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी मनोज जरांगे पाटील याची सभा होती.या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे सभेमध्ये खुप गर्दी होती गर्दीचा फायदा घेवुन चोरानी एकाच्या गळयातील सोन्याची चैन चोरली होती त्याचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 419/2025 कलम 303(2) बी.एन.एस प्रमाणे दाखल होता. सदरील चोरीस गेलेली सोन्याची चैन चा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत होती. तांत्रिक बाबीची मदत घेवुन यातील सोन्याची चैन ही अशोक वसंत सदरे यानी चोरल्याची माहीती मिळाली.
बीड पोलिसांकडून आरेापीचा शोध सुरु होता परंतु आरोपी मिळत नव्हता. दिनांक 05.08.2025 रोजी गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, अशोक वसंत सदरे हा चैन चोर नगर नाका बीड येथे थांबलेला असुन सोन्याची चैन विक्री करण्यासाठी जात आहे अशी माहीती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास झडप मारुन पकडले व त्याचे पॅन्टच्या खिश्यात चोरीस गेलेली चैन मिळुन आली ती चैन त्याने दिनांक 01.08.2025 रोजी रामकृष्ण लॉन्स बीड येथे चोरल्याचे कबुल केले आहे. आरोपी अशोक वसंत सदरे, वय 48 वर्ष, रा. करीमपुरा साळगल्ली, पेठ बीड याचेकडुन सोन्याची चैन किंमती 1,85,000 रु जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी पोलीस ठाणे शिवाजीनगर याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कामगिरी नवनित काँवत, पोलीस अधीक्षक,बीड,सचिन पांडकर, अपर पोलीस अधिक्षक बीड, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, पोलीस अंमलदार आशपाक सय्यद, मनोज परजणे, चालक नितीन वडमारे पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील दिलीप राठोड, रामकृष्ण रहाडे यांनी केली आहे.