अजिबात कोणाचे लाड केले जाणार नाही “कोणी आका असू नाही तर फाका असू”! : पालकमंत्री अजित पवार
कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी शासन केल्याशिवाय गप्प बसणार नाही.गुन्हेगाराला मकोका लावा.

बीड(प्रतिनिधी )बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात खून, गुंडगिरी,भाईगिरी,खंडणी प्रकरणात वाढ झाली असल्याने जिल्ह्याची ओळख ही गुन्हेगारी जिल्हा अशी झाली असून जिल्हा बदनाम झाला आहे.
खून,करणाऱ्याने बीड जिल्हा बदनाम झाला असून राज्यात याची चर्चा झाली यामुळे बीड जिल्ह्याची ओळख ही गुन्हेगारीचा जिल्हा अशी झाल्याने दुर्देवी आहे अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
बीड जिल्ह्याची ओळख सर्वांना चांगले काम करून पुसावी लागले. मुख्यमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता विविध विकास कामाचा आढावा घेतला तसेच बीड शहरातील विविध समस्या जाणून घेत त्यावर उपाय करण्याच्या सूचना देखील संबंधित विभागला दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
माजलगाव मतदारसंघातील मुंडे घराण्याशी भाजपचे एकनिष्ठ म्हणून ओळख असलेले राजाभाऊ मुंडे यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात झाला यावेळी व्यासपीठावर बोलताना अजित दादानी सांगितलेली गुंडगिरी,दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,तसेच कोणी आका, फाका असला तरी ज्याने गुन्हा केला आहे अशा कुणालाही सोडणार नाही असे परखड मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. वडवणीत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विविध मान्यवरांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी एसपींना आदेश दिलेले आहेत. एक, दोन वेळा ठिक आहे मात्र तिसऱ्या वेळी कुणी पुन्हा पुन्हा गुन्हेगारी वृत्तीने वागत असेल तर त्याला सोडू नका थेट मकोका लावा. जो चुकेल त्याला शिक्षा केली जाईल. जवळचा, लांबचा हे पाहिले जाणार नाही. सर्वांनी नीट वागा. बीडची ओळख गुन्हेगारी जिल्हा अशी होत आहे. ही ओळख पुसून टाकण्यासाठी यापुढे काम करावे लागेल. जिल्ह्यात विकासकामांसाठी येत्या काळात मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे. आताही काही कामे सुरु केली जात आहेत. मात्र चांगले काम करा अन्यथा कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करण्यासाठीही मागे पुढे पाहणार नाही.