तीन ठिकाणी जुगार अड्डावर छापा.
दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.

बीड पोलीस अधीक्षक यांनी बीड जिल्यामध्ये चालणाऱ्या अवैध धंदयाची माहीती काढुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दिवसात तीन जुगार अड्डावर छापा मारुन कारवारई केली असुन त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने याचे पथकाने पोलीस ठाणे केज हद्यीत नांदुरघाट येथे दिक्षा किराणा च्या मागे चालणाऱ्या तिरट नावाचा जुगारावर छापा मारुन आरोपी 1. बबलु सत्तार शेख, वय 31 वर्ष, रा नांदुरघाट, 2. अविनाश तुकाराम लोंढे, वय 30 वर्ष, 3. नवनाथ निवृत्ती मगरे, वय 38 वर्ष, 4. बबन एकनाथ गायकवाड, वय 70 वर्ष, 5. आकाश बापु शिंदे, वय 23 वर्ष, 6. सुशिल शिवाजी त्रिमुखे, वय 43 वर्ष, 7. प्रकाश गेणबा जाधव, वय 40 वर्ष, 8. चंदु दशरथ जाधव, वय 30 वर्ष, 9. ऋषिकेश भिमा गायकवाड, वय 22 वर्ष, सर्व रा नांदुरघाट व 10. विनोद देविदास हांगे, वय 31 वर्ष, रा हांगेवाडी, ता. केज यांना पकडुन त्याचे ताब्यातुन तिरट जुगाराचे साहीत्य, नगदी, मोबाईल, मोटार सायकल असा एकुण 2,63,060 मुद्देमाल हस्तगत करुन त्याचे विरुधद पोलीस ठाणे केज गु.र.नं 437/2025 कलम 12 (अ) मु.जु.का प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे, तसेच त्याच पथकाने पोलीस ठाणे दिंद्रुड हद्दीत तेलगांव ते परळी रोडलगत ईसार पेट्रोलपंपाचे मागे तिरट जुगार खेळणाऱ्या आरोपी 1. दत्ता मधुकर लगड, वय 42 वर्ष, 2. अक्षय सुरेश लगड, वय 28 वर्ष, 3. सचिन नारायण कटारे, वय 45 वर्ष, 4. पोपट प्रकाश सोनवणे, वय 33 वर्ष, 5. बळीराम नामदेव तिडके, वय 45 वर्ष, 6. अंकुश लक्ष्मण लगड, वय 45 वर्ष सव रा तेलगांव याना पकडुन त्याचे ताब्यातुन नगदी, जुगाराचे साहीत्य, मोटार सायकल मोबाईल असा एकुण 2,12,700 रु मुद्देमाल जप्त् करुन त्याचे विरध्द पोलीस ठाणे दिंद्रुड गु.र.नं 212/2025 कलम 12 (अ) मुजुका प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर याचे पथकाने पोलीस ठाणे पेठ बीड येथील नागोबा गल्ली येथे तिरट नावाचा जुगार चालणाऱ्या अड्ड्यावर छापा मारुन आरोपी 1. अब्दुल फईल जलीम मोमीन, वय 48 वर्ष, 2. कृष्णा अशोक परळकर, वय 23 वर्ष, 3. वैभव पांडुरंग तांगडे, वय 25 वर्ष, 4. अमित शरद जोगदंड, वय 21 वर्ष, 5. अकबर मुसा खॉन, वय 39 वर्ष, 6. राजु रवी क्षीरसागर, वय 32 वर्ष, 7. संकेत चंद्रकांत तांगडे, वय 28 वर्ष, 8. शेख अमेर शेख अन्सार, वय 28 वर्ष, सर्व रा बीड यांना पकडुन त्याचे ताब्यातुन दुचाकी, मोबाईल, नगदी असा एकुण 6,35,570 रू मुद्देमाल हस्तगत करुन त्याचे विरुधद पोलीस ठाणे पेठ बीड गु.र.नं 228/2025 कलम 4,5 मु.जु.का प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
सदरील कामगिरी नवनित काँवत, पोलीस अधीक्षक, बीड,सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार, महेश जोगदंड, आनंद म्हस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, बप्पासाहेब घोडके, अर्जुन यादव, आशपाक सय्यद, मनोज परजणे, चालक नितीन वडमारे, सुनिल राठोड, गणेश मराडे स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.