पावसाचे पाणी थेट घरात शिरले,नगरपालिकेचा गलथान कारभार उघड.
नगरपालिकेच्या गलथान कारभार उघड,जीविहानी झाल्यास नगरपालिका जबाबदार.

बीड( प्रतिनिधी) पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी सुरुवातीला पाऊस समाधानकारक झाल्याने जवळजवळ सर्वच तालावर नदी,ओसंडून वाहिले होते.परंतु दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली.
रात्रीच्या झालेल्या संततधार पावसाने माजलगाव शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे हाल झाले. माजलगाव शहरातील नाले सफाई झाली नसल्याने शहरातील नाले, गटारांतील पाणी थेट वसीम नुरमीया कुरेशी रा.महेबुब नगर मजरथ रोड यांच्या घरात शिरल्याने घरातील संसार उपयोगी वस्तू पाण्यात गेल्याने आर्थिक नुकसान झाले.शिवाय विद्युत शॉक लागण्याचा देखील धोका झाला असून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
नगरपालिकेने यापूर्वी नालेसफाई आणि गटार दुरुस्तीचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात पाणी साचण्याची समस्या सुटली नाही. काही रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक संत गतीने सुरू होती.नालीतील पाणी रस्त्यावर आल्याने शहर वासियाना पाण्यातून मार्ग शोधावा लागल्याने नागरिकानि संतप्त भावना व्यक्त केल्या.
फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, धान्य यांचे मोठे नुकसान झाले.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “दरवर्षी पावसात आम्हाला याच परिस्थितीला सामोरे जावे लागते. कर वेळेवर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच मिळतात.”
याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी व इंजिनीयर यांना वेळोवेळी तक्रार करून सांगून देखील दुर्लक्ष केल्यानेच घरात पाणी शिरले.यावर संबंधित अधिकाऱ्यांशी इंजिनियर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,मी येऊन काम करू काय?असे उलट उत्तर दिल्याने मुजोर इंजिनीयरला निलंबित करा अशी मागणी केली.माजलगांव नगरपरिषद कार्यालय मध्ये फक्त गुत्तेदारास पोसण्याचे काम होत आहे
बांधकाम इंजिनिअर गिते यांचे मानमानी कारभार सुरू असून याच्या वर कोणीही काही बोलत नाही तसेच यांनी आज पर्यंत शहरातील नाल्या रस्ते फक्त गुत्तेदारास कामे देऊन बिल काढण्याचे कामे केले संबंधित गुत्तेदार यांनी जरी चूकीचे कामे केले तरी वरिष्ठांकडून यांना पोसण्याचे काम चालू आहे
मुख्याधिकारी यानां कळविण्यात येते कि माजलगाव शहरातील सर्व कामाची चौकशी समिती मार्फत योग्य कार्यवाही करण्यात यावी.
माजलगांव नगरपरिषद कार्यालय मध्ये टक्केवारी जास्त मिळत अस अनेक गुन्हे दाखल सुद्धा झाले परंतु बीड जिल्हाधिकारी कार्यालय सह आयुक्त नगरविकास विभाग यांना जाग येत नाही कोणत्या तक्रारी वर चौकशी सुद्धा करीत नसल्याने आज भ्रष्टाचार करण्यासाठी टक्केवारी खाणाऱ्या अधिकाऱ्यावर काहीच कारवाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळेच घरात पाणी शिरले असून त्या इंजिनिअर वर तत्काळ करावी अशी मागणी केली आहे.