ब्रेकिंग न्यूज

गेवराईत प्रा.लक्ष्मण हाकेच्या गाडीवर दगडफेक.

आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक.हाकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न.

बीड (प्रतिनिधी): ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करून गाडीवर दगडफेक झाल्याची घटना आज दुपारी साडेपाच वाजेच्या दरम्यान गेवराईमध्ये छत्रपती शिवाजी चौकात घडली. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती असून यामुळे हाके आणि पंडित समर्थक समोरासमोर येऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता.

गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या सहकाऱ्यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या समर्थनाथ गेवराईमध्ये बॅनर लावले होते. यावरून बीड दौऱ्यावरील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार पंडित यांच्यावर टीका केली. त्यानंतर आज बीडकडे जात असताना छत्रपती शिवाजी चौकात हाके थांबले होते.यावेळी आमदार पंडित समर्थक अचानक आक्रमक झाले. त्यांनी हाके यांच्यावर हल्ला चढवला, मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली. त्यानंतर हाके आणि पंडित समर्थक समोरसमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत हाके यांना बीडच्या दिशेने पुढे रवाना केले.

दोन दिवसापूर्वी हाकेनी देवाचे आमदार जिसे पंडित यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने हाकेचा तुला जाळून हकीगत घोषणाबाजी करण्यात आली होती त्याच चौकात हाकेनि वाहनातून खाली उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलत असतानाच हाके यांच्यावर आमदार पंडित यांचे कार्यकर्ते धावून आले. हाके यांच्या गाडीवर चढून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिस आणि हाके समर्थकांनी वेळीच धाव घेतली. हाके यांना गाडीत बसवून तेथून रवाना करण्यात आले. यावेळी गेवराई मुख्य रस्त्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button