अंबाजोगाईत एकाची यांची निघृण हत्या.
अविनाश देवकर यांच्या डोक्यात सपासप वार करून केली हत्या.

बीड दि. २६ (प्रतिनिधी): –बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून मारामारी,हत्याचे सत्र कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत शर्तीचे प्रयत्न करत आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे.आंबेजोगाई शहरात पुन्हा हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आंबेजोगाई शहरात डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन अविनाश देवकर (वय ३५) यांची निघृण हत्या झाल्याची घटना अंबाजोगाई शहराजवळ मंगळवारी रात्री ८.३० वाजता घडली. हत्या कोणी आणि कोणत्या कारणावरुन केली हे उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
दरम्यान या घटनेने अंबाजोगाईत खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. अंबाजोगाई शहरातील रायगड नगर येथील अविनाश शंकर देवकर (वय ३५) हे मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये बसले असतांना त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. यामध्ये प्रचंड रक्तस्त्राव होऊन अविनाशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून घटनेची माहिती कळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.बीड जिल्ह्यात पुन्हा हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.