अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता घेताना पोलीस रंगेहात पकडला.
२०,००० ची लाच घेताना पोलिस कर्मचारी तांदळे एसीबीच्या जाळ्यात.

बीड(प्रतिनिधी)बीड पोलिस दलातील लाचखोरी पुन्हा उघड झाली असून,मागील काही महिन्यात पोलिस व महसूल मध्ये लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
दिनांक 01.09.2025 रोजी तक्रारदार यांनी पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि बीड यांचेकडे तक्रार दिली की, तक्रारदार यांचे हायवा गाडी मधुन पाटोदा पोलीस ठाणे हद्दीत वाळुची वाहतुक करण्याच्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याकरीता 20,000 / रुपये हप्त्याचे स्वरुपात लाचेची आलोसे यांनी मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचे कडे तक्रार दिली.
दिनांक 01.09.2025 रोजी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी तक्रारदार व पंच क्र. 1 यांना आलोसे सचिन तांदळे यांच्याकडे पाठवून पडताळणी केली असता, आलोसे सचिन तांदळे यांनी तक्रारदार यांचे हायवा गाडी मधुन पाटोदा पोलीस ठाणे हद्दीत वाळुची वाहतुक करण्याच्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याकरता 20,000 / रुपये हप्त्याचे स्वरुपात लाचेची पंचासमक्ष मागणी करुन आलोसे सचिन तांदळे यांनी 20,000 / रुपयेची स्वीकारण्याचे मान्य केले.
तक्रारदाराकडून पंचासमक्ष लाचेची रक्कम 20,000 / रुपये ही आलोसे सचिन तांदळे यांनी पोलीस ठाणे पाटोदा समोर आंबेडकर चौकात स्विकारले असता आलोसे यांना सापळा पथकाने ताब्यात घेऊन लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त केली. त्यांचे विरुध्द आज दिनांक 01.09.2025 रोजी पोलीस ठाणे पाटोदा जिल्हा बीड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिस विभागातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, तांदळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस कर्मचारी तांदळे हा कोणासाठी पैसे वसुली करत होता याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे.
सदरची कारवाई माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, शशिकांत शिंगारे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, पोलीस उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, गणेश म्हेत्रे, संतोष राठोड, अविनाश गवळी, प्रदिप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, बिभीषण सांगळे, अंबादास पुरी सर्व ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्ट्राचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधवा.