ब्रेकिंग न्यूज

खुनातील आरोपी 12 तासाच्या आत जेरबंद.

मित्रानेच केला मित्राचा घात,छातीत चाकू खुपसून अभिषेक फरार झाला होता.

बीड(प्रतिनिधी)बीड दिनांक 02/09/2025 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत महाराणा प्रताप चौक, बीड येथे इसम नामे अभिषेक राम गायकवाड व विजय सुनिल काळे यांचेत शुल्लक शाब्दीक वादा वरुन इसम नामे अभिषेक राम गायकवाड याने त्याचेकडे असलेल्या धारदार चाकुने विजय सुनिल काळे याचे डावे बाजुस छातीत वार करुन गंभीर जखमी करुन जिवानीशी ठार मारुन तो पळुन गेला होता. सदर आरोपी विरुध्द सुनिल मारोती काळे वय 47 वर्षे, व्यवसाय शिव जेन्टंस पार्लर चालक, रा. बाराभाई गल्ली धारुर ता धारुर जि.बीड ह.मु. स्वराज्य नगर, बार्शी रोड, बीड यांनी दिले फिर्यादी वरुन शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुरनं. 452/2025 कलम 103 बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

शुल्ल कारणावरून झाला होता वाद : 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात मयत काळे याने गायकवाड यांच्या दुचाकीची किल्ली काढून घेतल्याने किल्ली परत दे म्हणून सांगूनही तो देत नसल्याने मित्राने रागाच्या भरात वार करुन खून केल्याची माहिती आरोपीकडून सांगण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आरोपी अभिजित गायकवाड यास डोंगरातून एलसीबी व शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यावेळी सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवुन गुन्हयातील फरार आरोपी अभिषेक राम गायकवाड याचा शोध घेणेकामी मा. वरिष्ठांचे आदेशान्वे पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील चार पथक व स्थागुशा बीड येथील दोन पथक अशी वेगवेगळया पथके तयार करुन वेगवेगळया परिसरात शोध घेणेकामी रवाना केले होते. रात्रभर फरार आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी अभिषेक राम गायकवाड हा काकडहिरा ता. पाटोदा जि. बीड शिवाराचे परिसरात डोंगरात दबा धरुन बसल्याची गोपनीय माहिती मिळल्यावरुन सदर ठिकाणी तात्काळ पथक रवाना करुन सदर आरोपीचा मोठ्या शिताफीने व कसोशीन डोंगर दऱ्यात शोध घेवुन तो पळुन जात असतांना डोंगरामध्ये त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन गुन्ह्यात अटक केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत साहेब, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग बीड हनपुडे पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहा. पोलीस निरीक्षक विलास मोरे, संदिप दुनगहु, गजानन क्षिरसागर, ग्रेडपोउपनि / वासुदेव मिसाळ, पोहवा/1664 रवी आघाव, पोहवा/562 भास्कर केंद्रे, पोना/1244 संतोष राऊत, पोहवा/51 माने, मपोह अनिता खरमाटे, पोना/470 ज्ञानेश्वर मराडे, पोशि/2077 बाळु रहाडे, पोशि/305 दिलीप राठोड, पोशि/ 617 अशोक राडकर, पोशि/ 485 विलास कांदे, पोशि/1385 राजेभाऊ जाधव, पोशि/777 लादे, पोशि/273 नवनाथ डाके, पोशि/904 लिंबाजी महानोर, पोशि/193 अमोल लोंढे व स्थागुशा, बीड येथील पोहवा/1626 राहुल शिंदे, पोहवा/732 दिपक खांडेकर यांनी केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button