
बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात मारामाऱ्या,खुनाच्या घटना घडत असून दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत विजय काळे नामक तरुणाचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आज पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मेंढपाळचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना पहाटे घडली आहे. खुनाच्या या घटनेने जिल्हा हादरला असून खून करून आरोपी फरार झाला घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड आणि त्यांच्या टीमने धाव घेतली असल्याचे कळते.
रायामोह पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या दगडवाडीमध्ये दीपक केरा भिल्ला (बहानपूर, मध्यप्रदेश) या मेंढपाळचा दगडाने ठेवून खून करण्यात आला आहे. पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली असून आरोपी फरार झाल्याचे कळते. पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करीत असून मागच्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात खुनाचे प्रकार वाढले असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांनी मेंढपाळाचा खून जाताना एका विश्वास पाहिले असून त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून आरोपीचा शोध बीड स्थानिक गुन्हे शाखा व पाटोदा पोलीस करत आहेत.