ब्रेकिंग न्यूज

परळीत अवैध दारू साठ्यावर पोलिसांची कारवाई!

ड्रायडे ला बीड जिल्ह्यामध्ये अवैध दारूचा महापूर.

परळी प्रतिनिधी :- परळी शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिसांनी पूर्ण शहरांमध्ये सुरक्षेच्या कारणाने फेरी करत असताना काही ठिकाणी दारू दुकान चालू असल्याचे दिसून आले आल्याने संभाजीनगर पोलिसांनी श्यामप्रसाद मुखर्जी उडान पुलाजवळ वाल्मिकी नगर मध्ये एका राहत्या घरामध्ये जवळपास लाखो रुपयांचा देश दारूचा बॉक्स जप्त केला आहे आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे तो देशी दारूचा माल कुठून आला कसा आला याची चौकशी संभाजीनगर पोलीस करत आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संभाजीनगर पोलीस स्टेशनला चालू आहे तुम्हाला कुठून आणि कसा आला याचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत तपासामध्ये तू कुणाचा माल आहे हे निष्पन्न होईल अशी माहिती संभाजीनगर पोलिसांनी दिली आहे ही कारवाई संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे नरहरी नागरगोजे साजिद पठाण प्रवीण पुरे भगवान चव्हाण शंकर डोंगरे गणेश येरडलावार यांनी कारवाई केली आहे.

बीड ‎जिल्ह्यात अवैध दारू, शिंदी विक्री खुलेआम होत असून याकडे दारूबंदी अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे. बीड शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गल्ली गल्ली मध्ये अवैध दारू विक्री होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button