बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव.
जिल्हा परिषद,पंचायत समितीचे आरक्षण जाहीर.

बीड, (प्रतिनिधी): राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण ग्रामविकास विभागाने जाहिर केले आहे, त्यानुसार बीड जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आले आहे. दरम्यान अध्यक्षपद अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. आता जिल्हयातील कोणते गट अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव राहतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांसाठी आरक्षण सोडतीची अधिसूचना जाहिर करण्यात आली असून बीडचे अध्यक्षपद अनुसुचित जाती महिलांसाठी राहणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोणते गट अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव राहतात त्याकडे लक्ष असणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासोबतच पंचायत समिती सभापतींसाठी आरक्षण संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार बीड जिल्हयात ६ महिला सभापती असणार आहेत. १ अनुसूचित जाती महिला, २ ओबीसी महिला, तर ३ सर्वसाधारण महिला असणार आहेत.