टायगर राकेश जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा !
गोरगरिबांची,अनाथांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा : राकेश जाधव

25 शिलाई मशीन, 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, 1001, नागरिकांचा एक लक्ष रुपयांचा अपघात विमा, महिला मातांना साडी वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर संपन्न.
बीड (प्रतिनिधी) टायगर ग्रुप महाराष्ट्राचे बीड जिल्हा अध्यक्ष राकेश अण्णा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नळवंडी नाका परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव व मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांच्यासह छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष, लातूरचे जिल्हाध्यक्ष, मराठवाड्यातील पदाधिकारी यांच्यासह बीड जिल्ह्यातील टायगर ग्रुप चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी परिसरातील वंचित असलेल्या महिलांना तब्बल 25 शिलाई मशीन वाटप करण्यात आले, यासह 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची पूर्ण किट, माता भगिनींसाठी साडी, रुग्णांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, एक हजार नागरिकांचा एक लक्ष रुपयांचा अपघात विमा, रुग्णांसाठी रुग्णवाहिका, आदी समाज उपयोगी उपक्रमांनी राकेश अण्णा जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी टायगर ग्रुप चे अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांनी राकेश जाधव यांच्या कार्याचा गौरव केला टायगर ग्रुप नेहमीच राकेश जाधव यांच्या पाठीशी व चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले, तसेच मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांनीही आपले मत मांडताना टायगर ग्रुप सामाजिक कामात सदा अग्रेसर असणारी संघटना असून राकेश जाधव यांचे समाजकार्य हे स्वतःच्या स्वखर्चाने सुरू असून असे कार्यक्रम घेण्यास माणसाचे मोठे मन लागते टायगर ग्रुप नेहमीच राकेश जाधव यांच्या पाठीशी असणार असल्याची कबुली यावेळेस पोखरकर यांनी दिली. टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर, मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विमा कवच, शैक्षणिक साहित्य, गोरगरिबांना मदत, रक्तदान, रुग्णवाहिका अर्पण यासह विविध कार्यक्रम करण्यात आले .
यावेळी परिसरातील आसाराम भाऊ गायकवाड, स्वप्निल भैया गलधर, सचिन मुळूक, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते भागवत तावरे, बाबरी मुंडे, विपुल गायकवाड, वीरेंद्र शेळके, संकेत ढोले, यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला तरुण व परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची व टायगर ग्रुप महाराष्ट्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.