बीड DYSP पदी पूजा पवार यांची नियुक्ती.
डॅशिंग महिला अधिकारी म्हणून पूजा पवार यांची ओळख.

बीड(प्रतिनिधी)बीड पोलीस उपाधीक्षक पदी विश्वांबर गोल्डे कर्तव्य बजावत होते. ते पोलिस सेवेतून काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत.बीड डीवायएसपी पदाचा अतिरिक्त पदभार आष्टीचे डीवायएसपी हानपुडे यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु आज गृह विभागाने बीडच्या डीवायएसपी पदी पुजापवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Dysp पूजा पवार यांनी यापुर्वी प्रशिक्षणार्थी डीवायएसपी म्हणून गडचिरोली,बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस ठाणे सह महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावलेले आहे.आता त्यांना गृहविभागाने बीड पोलीस उपाधीक्षक पदी नियुक्ती केली आहे.
मागील काही महिन्याचा कार्यकाळ पाहता बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक अधिकारी बीडमध्ये येण्यास अधिकारी तयार नाहीत, त्यामुळे बीड डीवायएसपी पदाचा अतिरिक्त पदभार आष्टीचे डीवायएसपी हानपुडे यांच्याकडे देण्यात आला होता. आता बीड डीवायएसपी म्हणून पुजा पवार यांची गृह विभागाने नियुक्ती केली आहे.
पूजा पवार यांचा बीड डीवायएसपी म्हणून कार्यकाळ पाहता त्यांनी अनेक कारवाया केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बीड शहरातील दाणे नगर भागातील चालत असलेल्या जुगार क्लबवर धाड मारून जुगारीना ताब्यात घेत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली होती. वडवणी मध्ये वेश्या व्यवसायात चालणाऱ्या लॉजवर धडक केली होती. मटका, गुटखा वर कारवाई करण्यात आल्या होत्या.तसेच बार्शी नाका भागात कत्तलं करण्यासाठी जनावराची वाहतूक करणारे पिकअप पाठलागा करून कारवाई केली होती.त्या वाहनावर कारवाई करत असताना जमावाने dysp पूजा पवार यांना दबाव टाकण्याचा व वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता परंतु पूजा पवार यांनी जमावाला न घाबरत कारवाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.यासह पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत वडवणी तालुक्यात अनेक कारवाया केलने त्यांची डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती.
गृह विभागाने आज बीड डी वाय एस प पदी पूजा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यापुर्वी पुजा पवार यांनी प्रशिक्षणार्थी डीवायएसपी म्हणून कर्तव्यदक्षपणे चांगले काम केलेले आहे. त्यामुळेच आता त्यांच्या या नियुक्तीने बीड विभागातील पोलिस खात्याच्या कामाला गती मिळणार आहे.विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील आत्ताचे वातावरण पाहता एक महिला डी वाय एस पी अधिकारी दिल्याने नक्कीच महिला वरील अन्याय,अत्याचार ,गुन्हेगारी व अवैध धंदे कमी होतील असे बोलले जात आहे.