बीड रेल्वे स्थानकाला डॉ.आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.
मागणी,निवेदनाची दखल न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रेम कांबळे यांचा आत्महत्येचा प्रयत्न.

बीड(प्रतिनिधी)बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे करीता गेली अनेक महिन्यापासून आंबेडकरवादी अनुयाया कडून संविधानीक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर उपोषण, आंदोलन करून मागणी वारंवार केली जात आहे. पालकमंत्री ना अजित (दादा) पवार,खासदार बजरंग सोनवणे यांना देखील निवेदने देऊन मागणी केली मात्र जिल्हा प्रशासन, पालकमंत्री हे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आंबेडकरवादी अनुयायी यांच्या कडून सांगीतले जात आहे. १७ सप्टेंबर रोजी बीड रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री बीड चे
पालकमंत्री अजित (दादा) पवार साहेब, यांच्या हस्ते बीड रेल्वे चे उद्घाटन झाले. यावेळी देखील आंबेडकरवादी अनुयायांनी बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे करीता मागणी केली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी शासन प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याचे सांगत बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी भीमसैनिक प्रेम कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे रात्री ९.३० च्या दरम्यान फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.मात्र वेळीच त्यांना खाली उतरवून रुग्णालयात दाखल केल्याने प्राण वाचले.कांबळें यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यासाठी आता सर्व आंबडकरी जनता मागणी करणार असून येत्या काळात हा लढा आणखी तीव्र होणार आहे असे दिसत असून,केंद्र,राज्यसरकारने व प्रशासनाने यांची तत्काळ दखल देऊन बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होत आहे.