दुचाकी चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात.
सहा दुचाकी हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड, दि. ३० सप्टेंबर :बीड जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून,या टोळीतील तब्बल सहा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.या आरोपींकडून एकूण सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून त्याची अंदाजे किंमत ३ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.
दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने शहरात सापळा रचला. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बीड, लातूर, बार्शी, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या परिसरात दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. तपासाअंती विविध ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली.
विविध ठाण्यांतील गुन्हे उघडकीस :
या आरोपींविरुद्ध खालील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते –
बीड शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. 269/2025 कलम 302(2) भा.दं.वि.
लातूर ग्रामीण: गु.र.नं. 703/2025 कलम 302(2) भा.दं.वि.
पुणे शहर, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे: गु.र.नं. 1677/2025 कलम 302(2) भा.दं.वि.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण: गु.र.नं. 463/2025 कलम 302(2) भा.दं.वि.
सोलापूर ग्रामीण: गु.र.नं. 572/2025 कलम 302(2) भा.दं.वि.
जप्त केलेल्या मोटारसायकली
पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांच्या एकूण सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये –
होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो (₹१,७०,०००)
होंडा कंपनीची स्प्लेंडर आयस्मार्ट (₹१,३६,०००)
होंडा कंपनीची शाइन (₹२,६०,०००)
हिरो कंपनीची पैशन प्रो (₹४५,०००)
होंडा कंपनीची शाइन (₹५५,०००)
होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस (₹६०,०००)
अशा मिळून ₹३,४०,००० किंमतीच्या दुचाकींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, आनंद मस्के, राहुल शींदे, अंकुश वरपे, आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी मिळुन केली आहे.त्यांच्या पथकाने केली.
सतत सुरू असलेल्या दुचाकी चोरीमुळे नागरिक चिंताग्रस्त होते. या टोळीचा पर्दाफाश झाल्याने बीडसह लातूर, सोलापूर, बार्शी आणि छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींनी आणखी किती चोरी केल्या आहेत याबाबत शोध घेण्यात येत आहे.