यश ढाका हत्येतील तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही : बाळा बांगर काय म्हणाले पहा.

बीड(प्रतिनिधी )बीड शहरात दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माने कॉम्प्लेक्स परिसरात पत्रकार पुत्र यश ढाका या तरुणाला टोळक्यांनी मारहाण करत एकाने याच्या पोटात चाकू खुपसल्याने यशचा जागीच मृत्यू झाला होता.या घटनेने बीड जिल्हा हादरला होता.
यशची हत्या केल्यावर सूरज काटे हा स्वतः शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गेला होता तर इतर आरोपी फरार झाले होते.आतापर्यंत पोलिसांच्या ताब्यात दोन आरोपी होते तर काल दिनांक 30 सप्टेंबर रोजी तिसरा आरोपी पोलिसानि ताब्यात घेतला.
पोलीसांनी मंगळवारी सकाळी कृष्णा सोनवणे यास पाटोदा येथून अटक केली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत सुरज काटे, सोमनाथ काटे यांना अटक केलेली आहे. कृष्णा सोनवणे हा या प्रकरणातील तिसरा अटक झालेला आरोपी आहे.तर इतर आरोपी अद्यापही फरार आहेत.
ढाका कुटुंबीयांनी बीड पोलीस अधीक्षकाची भेट घेऊन या हत्येत सामील इतर आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली होती.यावर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ढाका सर्व आरोपींना लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या हत्या प्रकरणातील अन्य आरोर्पीच्या शोधासाठी एलसीबी टीम परराज्यात गेल्याचे सुत्रांनी सांगितले.