कपिलधार वाडीतील घराला तडे,रस्त्याला पडल्या भेगा.ग्रामस्थ भयभीत.
80 जणांचे स्थलांतर,आमदार रोहित पवार,संदीप क्षीरसागर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कपिलधारवाडीला दिली भेट.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून संततधार पाऊस होत असल्याने नदी नाले तलाव ओसंडून वाहत आहेत. बीड तालुक्याला अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
बीड तालुक्यातील कपिलधार वाडीमध्ये मागील काही दिवसांपासून घरांना तडे पडणे असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कपिलधारवाडी ही पायथ्याशी वसलेली असून येथे 100 घरे आणि सुमारे 500 लोकसंख्या आहे. रात्री 12 वाजता अनेक गावकर्यांनी सुरक्षिततेसाठी तीर्थक्षेत्रात स्थलांतर केले,भयभीत होवून काहींनी नातेवाईकाकडे गेले आहेत.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्पुरती स्थलांतराची व्यवस्था आणि नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे. कपिलधार वाडीची माळीण होते की काय? अशी भिती निर्माण झाली असून, त्यामुळे गावकर्यांनी रात्र जागून घालवली. ज्या लोकांना शक्य होते त्यांनी रात्रीच स्थलांतर केले, मात्र उरलेल्या लोकांसाठी प्रशासनाने तातडीने मदत करावी, असे ग्रामस्थांनी सांगितले.
रस्त्याला पडलेल्या भेगा व घरांवरील तडे पडल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली असता रस्त्याला व घराला पडलेले तडे पाहण्यासाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत वरिष्ठ भू-वैज्ञानिक शंकर काळे देखील होते. भू-वैज्ञानिकांच्या मते, मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे जमीन साठवलेले पाणी 50-60 मीटर खोलवर गेले आहे. त्यामुळे जमीन जो कमकुवत भाग आहे तिथून हवा बाहेर पडल्याने घरांना व रस्त्याला तडे पडले आहेत. भू-वैज्ञानिक काळे यांनी ग्रामस्थांना सांगितले की, या भागात आणि परिसरात भूकंपाची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे सध्या कोणताही धोका नाही, ग्रामस्थांनी घाबरू नये. दरम्यान, आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार रोहित पवार यांनी देखील ग्रामस्थांची भेट घेतली आणि त्यांची काळजी व्यक्त केली. काही नागरिकांचे स्थलांतर केले गेले असून, प्रशासनाने त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क असून, भविष्यात अशा प्रकारच्या धोके टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
*प्रशासन सर्तक, तूर्तास धोका नाही-तहसीलदार*
या भागात कोणताही धोका नाही, आणि परिसरात भूकंपाची कोणतीही नोंदही नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या काही नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी मागणी केली आहे. या मागणीनुसार जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तहसीलदार शेळके यांनी सांगितले की, प्रशासन सर्तक असून, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक पावले उचलली जात आहेत.
*ग्रामस्थांची प्रतिक्रिया:*
कपिलधार वाडीतील घरांना तडे पडल्याने आणि रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहण्याची सोय करून नुकसान भरपाई द्यावी. कपिलधार वाडीची माळीण होते की काय? अशी भितीने गावकर्यांनी रात्र जागून घालवली, ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे अमोल शिंदे, ग्रामस्थ, म्हणाले. ज्यांना शक्य होते त्यांनी रात्रीच स्थलांतर केले, मात्र उरलेल्या लोकांसाठी प्रशासनाने तात्पुरती स्थलांतराची व्यवस्था करून पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.