बीड मधील पेट्रोल मध्ये आढळले पाणी ! वाहनधारकात संताप.
पेट्रोल पंपा समोरच ठिय्या आंदोलन,पोलिस दाखल.शहरातील सर्वच पेट्रोल पंप तपासणी करा : करण लोंढे.

बीड(प्रतिनिधी) बीड शहरातील पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांतून येत आहेत. पाणी मिश्रित पेट्रोल वाहनात टाकल्याने अनेक दुचाकी बंद पडून इंजिन काम देखील करावे लागत आहे.
आज दिनांक २ ऑक्टोबर गुरुवार रोजी जालना रोडवरील जाधव पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल आढळल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. या प्रकारामुळे अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे इंजिन बंद पडल्याने वाहनधारकाने पेट्रोल पंप मालकासमोर संताप व्यक्त केला.
पेट्रोलमध्ये पाणी आढळण्याची माहिती युवा नेते करण लोंढे यांनी पेट्रोल पंप समोर आंदोलन करत पोलीस व प्रशासनाला दिल्यानंतर तत्काळ पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंपावरील पेट्रोल तपासणीदरम्यान पेट्रोलच्या टाकीत पाण्याचे मोठ्या प्रमाण आढळले.
मागील काही दिवसांपासून शहरातील विविध पेट्रोल पंपावर पाणी मिसळल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र आज जाण रोडवरील पंपावर प्रत्यक्षात हा प्रकार उघडकीस आला. यामुळे नागरिकांनी पंप व्यवस्थापनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.
जाधव पेट्रोल पंपा समोरच करण लोंढे व इतर दुचाकी धारकांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. पाणी मिश्रित पेट्रोलमुळे कालपासूनच अनेक वाहनं बंद पडली असून वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी तात्काळ हा पेट्रोल पंप बंद करण्याची मागणी केली.
बीड शहरातील सर्व पेट्रोल पंपांची तपासणी करून पेट्रोल,डिझेल मध्ये पाणी आढळल्यास त्या पेट्रोल पंप चालकावर कारवाई करावी व पेट्रोल पंपाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी करण लोंढे यांनी केली आहे.