ब्रेकिंग न्यूज

निर्दयी बापाने चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बरेलमध्ये टाकून स्वतःघेतला गळफास !

चार दिवसापूर्वीच पत्नीला विष पाजून स्वतःविष घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न.

गेवराई दि. ३ (प्रतिनिधी)- पत्नीला विषारी औषध देऊन पतिने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घडवून दुसऱ्या दिवशी उपचार घेऊन दोघेही घरी आली तसे काळीज नसलेल्या या पतीने चक्क दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारच्या पहाटे आपल्या चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून त्याची हत्या केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेवराई तालुक्यातील तलवाडा तहत रामनगर येथील अमोल हौसराव सोनवणे याने त्याची पत्नी पायल अमोल सोनवणे हिला विषारी औषध पाजून स्वतः देखील औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न चार दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर दि. २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी ते आपल्या स्वतःच्या घरी उपचार घेऊन परतले होते. परंतु शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अमोल हौसराव सोनवणे (वय वर्षे ३०) याने स्वतःच्या चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकले व त्यानंतर त्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक दुर्दैवी घटना घडली आहे.

या घटनेचा कारण आतापर्यंत समोर आलेला नाही. परंतु चारित्र्याच्या संशयावरून हि घटना घडली असावी अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. मयत अमोल सोनवणेसह चार महिन्याच्या बाळाचे तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या दुर्दैवी घटनेची माहिती तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि मनोज निलंगेकर यांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक कैलास अनलदास, बीट अंमलदार शेख मोहसीन, जमादार नारायण काकडे, चालक पवन शेळके यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास तलवाडा पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेने तलवाडा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button