मद्यधुंद कार चालकाने दिली दुचाकीस्वाराला जोराची धडक.
दुचाकीस्वार थोडक्यात बचावला;पोलिसांनी रात्रीच्या वेळी"ड्रिंक अँड ड्राईव्ह"मोहीम राबवावी.

बीड (प्रतिनिधी) बीड शहराला लागत असलेले मुख्य रस्त्यावर, महामार्गावर धाबे,हॉटेल बारमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसन आहे. मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या हॉटेल, धाब्यावर व बारवर पोलिस व दारूबंदी अधिकारी कोणतीही कारवाई होत नसल्याची दिसत आहे.
बार्शी नाका,हिना पेट्रोल पंप परिसरात मद्यधुंद कार चालकामुळे अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.
बीड शहर वाहतूक शाखेकडून “ड्रिंक अँड ड्राईव्ह” मोहिमे अंतर्गत तपासणी सुरू असली, तरीही काही बेदरकार चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे उघड झाले आहे.
रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८:३० वाजता बार्शी नाका येथील हिना पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. MH १२-FY- ६३५१ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने दुचाकीस्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार थोडक्यात बचावला, वेळीच दुचाकीस्वार कारच्या बाजूला झाल्याने त्याला किरकोळ जखम झाली. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ धाव घेत कारचालकास खाली उतरवून बाजूला बसवले असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे बार्शी रोडवर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अशा मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वर पोलिसांनी कठोर कारवाई केली तरच अशा घटनांना आळा बसेल.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या वाहतूक शाखेकडून दिवसाच्यावेळी “ड्रिंक अँड ड्राईव्ह” तपासणी केली जाते. मात्र, बहुतेक वाहनचालक रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवतात, असा नागरिकांचा अनुभव आहे.
त्यामुळे नागरिकांकडून पोलिस प्रशासनाने रात्रीच्या वेळीही बीड शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व चौकामध्ये“ड्रिंक अँड ड्राईव्ह”मोहिम राबवावी आणि कठोर कारवाई करावी,अशी जोरदार मागणी होत आहे.