बीड नगराध्यक्ष पद एस.सी.महिलासाठी राखीव !
बीड नगरपालिकेत प्रथमच एस.सी.महिला होणार नगराध्यक्ष.

बीड- बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे एस सी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. बीड नगरपालिकेत प्रथमच एस सी महिलेसाठी राखीव जागा सुटली आहे.
आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात नगराध्यक्ष पदासाठी सोडत जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती च्या महिलेसाठी राखीव झाले आहेत यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक हाऊस गवश्या व नवश्याला धक्का बसला आहे.
दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठीचे आणि पंचायत समितीच्या सभापतीपदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे नगराध्यक्ष पदासाठी चे आरक्षण साठी सोडत काढण्यात आली.
बीड ला अनुसूचित महिला आरक्षण जाहीर झाले आहे.
तर ओबीसी प्रवर्गात माजलगाव ओबीसी महिला आणि अंबाजोगाई ओबीसी आरक्षण असणार आहे. गेवराई, धारूर, परळी नगरपालिका खुल्या प्रवर्गासाठी असून यात परळीमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण असणार आहे.
अनुसूचित जाती महिला : बीड
ओबीसी महिला : माजलगाव
ओबीसी : अंबाजोगाई
सर्वसाधारण महिला : परळी
सर्वसाधारण : गेवराई, धारूर