DYSP पूजा पवार यांनी पदभार स्वीकारला..
पूजा पवार लेडी सिंघम,दबंग महिला अधिकारी म्हणून ओळख.

बीड (प्रतिनिधी)बीड दि. ६ ऑक्टोबर २०२५ — महाराष्ट्र शासनाच्या १७ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) श्रीमती पूजा पवार यांची बीड उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारला आहे.
माजी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विश्वंभर गोळे हे दिनांक ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाल्याने बीड उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. दरम्यानच्या काळात या पदाचा अतिरिक्त कार्यभार बाळकृष्ण हनुमंते पाटील यांनी सांभाळला होता.
आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रीमती पूजा पवार यांनी बीड उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
या प्रसंगी बोलताना श्रीमती पूजा पवार म्हणाल्या,
“मी पूर्वी बीड जिल्ह्यात परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक म्हणून काम केले आहे, त्यामुळे जिल्ह्याची सखोल माहिती आहे. कायद्याचे पालन व नागरिकांच्या सेवेसाठी मी नेहमी तत्पर राहीन. न्यायनिष्ठपणे व पारदर्शकपणे पोलिस प्रशासनाचे कार्य करत राहणे हे माझे प्राधान्य असेल.”
पूजा पवार यांनी बीड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावली असून अवैध धंद्यावर धडाक कारवाया केल्याने चर्चेत होत्या.
वडवणी पोलिस ठाणे हद्दीत धडाकेबाज कारवाया केल्या होत्या.,बीड शहरातील बार्शी नाका भागात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची माहिती मिळताच टेम्पोसह चालकावर कारवाईं केली होती.यामुळे पूजा पवारांच्या तसेच बीड शहरातील एका जुगार अड्ड्यावर धाड मारली होती.
पोलिस अधीक्षक पूजा पवार यांनी पदभार स्वीकृतीनंतर पोलिस विभागात उत्साहाचे वातावरण असून, नागरिकांकडूनही नव्या अधिकाऱ्यांकडून कार्यक्षम नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डी वाय एस पी पदी महिला अधिकारी मिळाल्याने महिला वरील वाढते अत्याचार तसेच बीड मधील गुन्हेगारी नक्कीच कमी होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.