पूरग्रस्त बांधवांसाठी पुणे आंबेगावहून किराणा किटचे वाटप.
भैरवनाथ पतसंस्थेकडून पूर्वग्रस्ताला"मदतीचा हात"

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काही खेडेगावात तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आंबेगाव (मंचर, जि. पुणे) येथील तहसीलदार नागटिळक साहेब व नायब तहसीलदार प्रशांत जाधवर (बीड) यांच्या नियोजनातून, भैरवनाथ पतसंस्था व आंबेगाव येथील जनतेच्या पुढाकाराने पूरग्रस्त बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या किडचे वाटप बीड तहसील कार्यालय तसेच बीड जिल्ह्यातील विविध गावात वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमांतर्गत आज किराणा किट वाटपासाठी गाड्या रवाना करण्यात आल्या. या उपक्रमात मंडळ अधिकारी अंगद काशीद, पुरुषोत्तम आंधळे, अनिल तांदळे, दादा शेळके, महादेव चौरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते शाहेद पटेल, साहस आदोडे, राकेश जाधव आणि संदीप पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या किटचे वितरण हिंगणी हवेली, खामगाव, नांदूर हवेली, पारगाव जप्ती, हिंगणी खुर्द, बहिरवाडी, कुर्ला तसेच नाळवंडी नाका व अंकुश नगर येथील पूरग्रस्त भागांमध्ये करण्यात येणार आहे. आज आणि उद्या — अशा दोन दिवसांत या किट वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
या किटमध्ये गव्हाचे पीठ (5 किलो), तांदूळ (5 किलो), साखर, रवा, तेल, साबण यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील भैरवनाथ पतसंस्था आणि आंबेगाव येथील जनतेच्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त बांधवांची दिवाळी गोड झाली, असे स्थानिकांनी नमूद केले.