नगरसेवक संजय उडान झाले जलदूत !
मोफत पाणी पुरवठ्याचा आदर्श शहरातील इतर नगरसेवकांनीही घ्यावा.

बीड शहरातील बार्शी नाका भागातील लोकप्रिय नगरसेवक संजय उडान हे सतत गोरगरिबांची मदत करणारे नगरसेवक म्हणून यांची ओळख आहे.तसेच गोरगरीब,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात अग्रेसर असतात.सध्या शहराला पाण्याची टंचाई असल्याने संजय उडान यांनी आपल्या प्रभागामध्ये मोफत पाण्याचे टँकर देऊन नागरिकांची तहान भागवली. त्यामुळे संजय उडान यांना जलदूत म्हणून नागरिक संबोधित करत आहेत.
बीड शहरातील काही भागात एक महिना पूर्ण झाला तरी नगरपालिकेकडून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत.
ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याची पाणी मिळत नसल्याने नगरसेवक संजय उडान यांनी स्वतः पुढाकार घेऊन बार्शी नाका,बाजीराव नगर ढगे कॉलनी,प्रकाश आंबेडकर नगर,बाजीराव नगर,बिलाल नगर, अशोक नगर,पुनम गल्ली, ढोले वस्ती या भागात मोफत पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिल्याने बार्शी नाका भागातील नागरिकांची पाण्याविना होणारे हाल व भटकंती काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांनी नगरसेवक संजय उडान यांचे आभार मानले. बीड शहरातील इतर नगरसेवकांनीही संजय उडान यांचा आदर्श घेऊन आपल्या प्रभागामध्ये मोफत पाणी पुरवठा केला तर बीड शहरवासिया समोर नवा आदर्श निर्माण होईल.