परळीत टोळक्याकडून एका तरुणास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल.
पुन्हा बीड जिल्हा हादरला.गुन्हा दाखल,सात माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात.

बीड जिल्ह्यातील गुंडगिरी,गुन्हेगारी पुन्हा कशा प्रकारे वाढत आहे याचा एक धक्कादायक व्हिडीओच व्हायरल झाला आहे. परळी तालुक्यातील जलालपूर भागात आठ ते दहा जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला खाली पाडून बेदम मारहाण केली.मारहाण होत असताना तरुण मोठ मोठ्याने विव्हळत होता. मात्र तरी देखील टोळक्यातील एक एक करून प्रत्येक जण काठी, बेल्टने, लाथा बुक्क्यांने त्या तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला असून या घटनेने खळबळ उडाली असून बीड जिल्हा पुन्हा हादरला.
बीड जिल्हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याने मारहाणीचे ते व्हिडिओ व्हायरल झाल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर या जिल्ह्यातील गुंडगिरीचे,मारहाण करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आली होती.आता या सर्व घटना मागे पडत असतानाच परळील तालुक्यातील बेदम मारहाणीची ही नवी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्ररळीतील जलालपूर भागात टोळक्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे. परळी शहरातील जलालपूर येथे एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरून १० ते १२ जणांच्या टोळक्याने पीडित तरुणाचे अगोदर अपहरण केले. या टोळक्याने तरुणाला अमानुषपणे मारहाण केली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असून सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत.बीड जिल्ह्यात अशा अनेक टोळ्या सक्रिय असून सर्वाधिक परळी तालुक्यात टोळ्या असल्याचे बोलले जात आहे,यांची दहशत कमी करण्यासाठी अशा माथेफिरूंना कडक कारवाई करून शहरात धिंड काढावी अशी देखील मागणी नागरिकांतून होत आहे.
मारहाण करणाऱ्या सात मातेफिरूना अटक करून परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत.
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना करून त्या 7 माथेफिरूंना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.