ब्रेकिंग न्यूज

शोरूम मध्ये सर्विसिंग करताना जुने सामान टाकल्याने गळफास घेण्याचा प्रयत्न.

अनर्थ टळला,शोरूम मधील चोऱ्या वाढल्या.पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 

बीड येथील बार्शी रोडवरील युनिकॉर्न मोटर्स नावाने आयशरचे शोरूम आहे. पण येथे कुंपणच शेतखात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, दुरुस्तीसाठी आलेल्या एका आयशरचा एसीओ बॉक्स बदलून जुना बॉक्स टाकल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आयशर टेम्पो मालकाच्या तक्रारीवरून येथील मॅनेजर आणि स्टोअर किपरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मात्र अधिकृत शोरुम मध्ये असे प्रकार घडत असतील तर विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील बार्शी नाका परिसरात बार्शी रोडवर युनिकॉर्न मोटर्स नावाने आयशर कंपनीचे अधिकृत शोरुम आहे. येथे नवीन व जुन्या आयशर कंपनीचे विविध वाहने दुरुस्ती व सर्व्हिसिंग साठी येतात. येथे येण्याचा उद्देश हा चांगले काम होईल असा असतो. पण येथे वेगळेच प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. येथे दुरुस्तीसाठी एम.एच. २३ ए यू ६५६७ क्रमांकाचा आयशर टेम्पो आला होता. दुरुस्तीसाठी आलेला टेम्पो येथे ठेवण्यात आला. यावेळी युनिकॉर्न मोटर्सचा मॅनेजर आणि स्टोअर किपर दुरुस्तीसाठी आलेला टेम्पोचा एसीओ बॉक्स बदलला गेला असून हा मुळ ओरिजनल बॉक्स नाही असा आक्षेप टेम्पो मालकाने घेतला, पण त्याचे काहीच ऐकून घेण्यास शोरुम चालक ऐकून घेण्यास तयार नव्हते. पण टेम्पो मालकाने चक्क शोरुमच्या छताच्या लोखंडी गलवर चढून गळफास घेण्याचा इशारा दिला यानंतर यानंतर यंत्रणा हलली व याची माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली. पेठ बीड पोलीस ठाणे निरीक्षक अशोक मोदीराज यांनी सदरली शोरूकडे धाव घेऊन टेम्पो मालकाला खाली उतरण्यास भाग पाडून त्याचे म्हणणे ऐकून घेत कारवाई केली.यांनी या टेम्पोचा ओरिजनल २०२४ चा एसीओ बॉक्स बदलून त्या जागी दुसरा जुना वापरता एसीओ बॉक्सवरील सालाची खाडाखोड करुन २०२० चा बसवून संगणमत करुन फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणूक केली. या अशयाची फिर्याद टेम्पो मालक अशोक रावन शेळके रा. वांगी यांनी दिली. त्यावरून पेठ बीड पोलीस ठाण्यात आरोपी आशीम शेख (मॅनेजर), शारुख शेख (स्टोअर किपर) या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार माने हे करीत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button