ब्रेकिंग न्यूज

स्थानिक गुन्हे शाखा(LCB)प्रमुखपदी शिवाजी बंटेवाड.

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याचे बंटीवाड समोर आव्हान.

बीड पोलीस दलामध्ये गेल्या काही दिवसापासून बदल्यांचे सत्र सुरू आहे. पोलीस ठाण्यामध्ये पाच वर्षे पक्ष जास्त कार्यकाळ झालेल्या पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यात “कही खुशी काही गम”पाहायला मिळाला.कर्मचाऱ्यांच्या बदल्या नंतर आता ठाणे प्रमुख देखील बदलले जाणार आहेत.

बीड स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखपदाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार यावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, परंतु आज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांची वर्णी लागली आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी याबाबत आदेश जारी केलेत. उस्मान शेख यांची लातूरला बदली झाल्यानंतर LCB प्रमुखपदी अनेकांच्या नावाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर एलसीबीच्या प्रमुखपदी बंटेवाड हे कारभार पाहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

उस्मान शेख यांची लोकसभा निवडणुकीनंतर एलसीबीच्या प्रमुखपदी वर्णी लागली होती. ११ महिन्यांचा त्यांचा कालावधी चांगला राहिला. दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या आरोपांमध्ये त्यांचे नाव आल्याने त्यांनी विनंती बदलीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची बदली झाल्यानंतर आता शिवाजी बंटेवाड यांची एलसीबीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या नंतर बीड पोलीस दलातील अनेक कर्मचारी अधिकारी यांचे गुन्ह्यातील आरोपी सोबत संबंध उघड झाल्याने बीड पोलीसाची बदनामी झाली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये कायदा व सुववस्था योग्य हाताळण्यासोबतच गुन्हेगारी रोखणे व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शांततेत पार पाडणे यासाठी नूतन एलसीबी प्रमुखांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यांचा ग्रामीण पोलीस ठाण्यातील कार्यकाळ चांगला राहिला आहे. शांत, शिस्तप्रिय आणि संयमी असलेल्या अधिकाऱ्याला अखेर एलसीबीच्या खुर्चीवर पोलीस अधिक्षक यांनी संधी दिली आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button